कोल्हापूर जिल्ह्यात 34 नवीन आधार केंद्रांसाठी अर्ज सुरू! दहावी/बारावी पात्र उमेदवारांना मोठी संधी

|
Facebook

कोल्हापूर जिल्ह्यात ३४ नवीन आधार केंद्रे ६ जुलैपूर्वी ऑनलाईन अर्ज करा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन आधार संच वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ३४ आधार केंद्रे वाटप होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२६ आहे. फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील. कोण अर्ज करू शकतो, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या हे सगळं या लेखात सविस्तर आहे.

ही संधी नक्की काय आहे?

आधार केंद्र चालवणं ही एक चांगली उपजीविका आहे. नागरिकांना आधार नोंदणी, आधार अपडेट, बायोमेट्रिक दुरुस्ती या सगळ्या सेवा स्थानिक पातळीवर देता येतात आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळतं. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक गावांमध्ये आधार केंद्र नाहीत किंवा जे आहेत ते अपुरे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने नव्याने ३४ आधार केंद्रांसाठी अर्ज मागवले आहेत. ही जाहिरात १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झाली आणि अर्ज स्वीकारण्याचा कालावधी १२ जून ते ६ जुलै २०२६ असा आहे. म्हणजे आत्ता फक्त मोजकेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे उशीर न करता तयारीला लागा.

हे आधार केंद्र कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाटप केले जाणार आहेत. कोणत्या तालुक्यात, कोणत्या महसूल मंडळात आणि कोणत्या गावात किती केंद्रे उपलब्ध आहेत याची संपूर्ण यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे. या यादीत तुमचं गाव आहे का ते आधी तपासा कारण फक्त त्याच गावांसाठी अर्ज करता येईल.

अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?

या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे “आपले सरकार सेवा केंद्र” चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. म्हणजे हे केवळ नागरिकांसाठी नाही जे लोक आधीच CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालवतात त्यांनाच हे आधार संच मिळण्यासाठी अर्ज करता येतो. शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यापूर्वी ज्यांनी आधार केंद्रासाठी कार्यालयाकडे अर्ज केलेला आहे त्यांचे जुने अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यांनाही या नवीन जाहिरातीनुसार नव्याने अर्ज करावा लागेल. हा नियम महत्त्वाचा आहे कारण अनेक जण जुन्या अर्जावर अवलंबून राहतात आणि मग संधी हातून जाते.

फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील हे ठळकपणे सांगण्यात आलं आहे. ऑफलाईन म्हणजे हातानं भरलेले किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मुदत संपल्यानंतर आलेला कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अपूर्ण माहिती असलेले अर्जही रद्द होतात. त्यामुळे अर्ज वेळेत आणि पूर्ण माहितीसह सादर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

ही यादी आधीच तयार करून ठेवा कारण अर्ज भरताना सगळी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

तुमचा आपले सरकार सेवा केंद्राचा वीस अंकी आयडी हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र आहे. हा नंबर नसेल तर अर्ज करताच येणार नाही. त्यानंतर आधार कार्ड लागेल ओळखीचा मुख्य पुरावा म्हणून. पॅन कार्डही द्यावं लागेल. शैक्षणिक प्रमाणपत्र लागेल किमान बारावीची मार्कशीट. आपले सरकार सेवा केंद्राच्या Dashboard चा Screenshot द्यायचा आहे हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही खरोखर केंद्र चालवत आहात हे यातून सिद्ध होतं. एप्रिल २०२६ ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीतलं चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच Police Verification Certificate लागेल. जर तुमच्याकडे Supervisor चं प्रमाणपत्र असेल तर ते द्यावं लागेल हे Supervisor Certification UIDAI कडून मिळतं. Operator चं प्रमाणपत्र असेल तर तेही द्यावं. रहिवासी पुरावा द्यावा लागेल म्हणजे तुम्ही त्याच भागात राहता हे सिद्ध करणारा दाखला.

एक महत्त्वाची गोष्ट कागदपत्रे स्कॅन करताना मूळ कागदाचीच स्कॅन करा, झेरॉक्स प्रतीची स्कॅन करू नका. बरेच जण झेरॉक्स काढतात आणि त्याचाच स्कॅन अपलोड करतात हे चुकीचं आहे आणि त्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. ओरिजनल कागद हातात घ्या, त्याचा स्पष्ट फोटो काढा किंवा स्कॅनर वापरा आणि तोच PDF अपलोड करा.

अर्ज मंजूर झाल्यावर अतिरिक्त कागदपत्रे

अर्ज मंजूर झाल्यानंतर काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतात. यात NSEIT चं Supervisor प्रमाणपत्र लागतं. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांना ते आधी मिळवावं लागेल. चारित्र्य प्रमाणपत्र परत द्यावं लागेल. UIDAI ने ठरवलेल्या इतर अटींची पूर्तता केल्याचे पुरावेही द्यावे लागतात. त्यामुळे अर्ज करताना या सगळ्या गोष्टींची आधीच तयारी करून ठेवणं शहाणपणाचं आहे अर्ज मंजूर होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा.

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अर्ज करण्यासाठी kolhapur.gov.in या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे आधार संच वाटप जाहिरातीची लिंक दिलेली असेल, त्यावर क्लिक करायचं. नवीन पेज उघडेल जर आधी नोंदणी केलेली नसेल तर “Register Here” वर क्लिक करायचं. तिथे तुमचा CSC आयडी किंवा VLE ID टाकायचा, नाव टाकायचं, Email ID आणि मोबाईल नंबर द्यायचा. नोंदणी पूर्ण झाल्यावर Login करायचं आणि अर्जाचा फॉर्म भरायला सुरुवात करायची.

फॉर्ममध्ये भरायची माहिती बरीच असते. तुमचं पूर्ण नाव, पत्ता, केंद्राचा पोस्टल पिन कोड, आपले सरकार सेवा केंद्राचा आयडी, मोबाईल नंबर, Email ID, Supervisor प्रमाणपत्र असेल तर त्याचा नंबर, आधार क्रमांक, PAN कार्ड नंबर, शैक्षणिक पात्रता, तुम्हाला ज्या ग्रामीण किंवा शहरी क्षेत्रात केंद्र हवं आहे ते क्षेत्र, तालुक्याचं नाव हे सगळं अचूक भरायचं. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जातो, नंतर सुधारण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे एकदा भरण्यापूर्वी सगळी माहिती कागदावर लिहून ठेवा, मग एकत्र फॉर्म भरा यात घाई करू नका.

कोणत्या गावांमध्ये केंद्रे उपलब्ध आहेत?

जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुकानिहाय, महसूल मंडळनिहाय आणि गाव स्तरावर किती आधार केंद्रे वाटप होणार आहेत याची संपूर्ण यादी प्रकाशित केली आहे. या यादीत तालुक्याचं नाव, मंडळ कार्यालयाचं नाव, गावाचं नाव आणि किती संच वाटप होणार हे सांगितलेलं आहे. एकूण ३४ केंद्रे उपलब्ध आहेत. ही यादी kolhapur.gov.in वर डाउनलोड करता येते. अर्ज करण्यापूर्वी ही यादी नक्की पाहा कारण तुमचं गाव किंवा परिसर यादीत असेल तरच तुम्ही त्या भागासाठी अर्ज करू शकता.

या चुका केल्या तर अर्ज बाद होईल

पहिली चूक मुदत संपल्यानंतर अर्ज करणे. ६ जुलै २०२६ नंतर आलेला कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही. दुसरी चूक अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे. एखादी गोष्ट राहिली तरी अर्ज नाकारला जातो. तिसरी चूक झेरॉक्सची स्कॅन अपलोड करणे. मूळ कागदाचीच स्कॅन लागते. चौथी चूक जुन्या अर्जावर अवलंबून राहणे. आधी कार्यालयाकडे अर्ज केला असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही नवीन ऑनलाईन अर्ज करावाच लागेल. पाचवी चूक ऑफलाईन अर्ज पाठवणे. फक्त ऑनलाईन अर्जच चालेल.

६ जुलैपूर्वी हे करा

यादी डाउनलोड करा आणि तुमचं गाव त्यात आहे का बघा. सगळी कागदपत्रे आधार, पॅन, बारावीची मार्कशीट, CSC आयडी, Police Verification, Dashboard Screenshot एकत्र करा. प्रत्येक कागदाची ओरिजनल स्कॅन तयार करा. kolhapur.gov.in वर जाऊन नोंदणी करा आणि अर्ज भरा. अर्ज Submit केल्यावर Confirmation नंबर किंवा Screenshot जपून ठेवा. पात्र-अपात्र यादी प्रकाशित झाल्यावर त्याच वेबसाईटवर जाऊन तुमचं नाव तपासा.

वेळ कमी आहे, तयारी जास्त लागते त्यामुळे आजच सुरुवात करा.

कोल्हापूर नवीन आधार केंद्र भरती 2026 – महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे (Q&A)

प्रश्न 1: कोल्हापूर जिल्ह्यात कोणती नवीन भरती जाहीर झाली आहे?

उत्तर: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात नवीन आधार केंद्र (आधार संच) सुरू करण्यासाठी एकूण 34 नवीन आधार केंद्रांचे वाटप करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

उत्तर: अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

प्रश्न 3: अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 जून 2026 पासून सुरू झाली आहे.

Question 4: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2026 आहे.

प्रश्न 5: एकूण किती नवीन आधार केंद्रांचे वाटप होणार आहे?

उत्तर: या जाहिरातीनुसार एकूण 34 नवीन आधार केंद्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रश्न 6: अर्ज कुठे करायचा?

उत्तर: अर्ज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन भरावा.

प्रश्न 7: यापूर्वी अर्ज केलेला असेल तर पुन्हा अर्ज करावा लागेल का?

उत्तर: होय. यापूर्वी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सर्व इच्छुकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

प्रश्न 8: ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील का?

उत्तर: नाही. फक्त ऑनलाईन अर्जांचा विचार केला जाईल.

प्रश्न 9: मुदत संपल्यानंतर अर्ज करता येईल का?

उत्तर: नाही. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

प्रश्न 10: अपूर्ण अर्ज स्वीकारले जातील का?

उत्तर: नाही. अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज नाकारले जाऊ शकतात.

MahaIndia Live टीम

MahaIndia Live टीम केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या योजना, शेतकरी अपडेट्स, कागदपत्रे व लाभार्थी माहिती अधिकृत स्रोतांवरून पडताळून सोप्या मराठी व हिंदी भाषेत सादर करते.

Keep Reading

Leave a Comment